7 डिसेंबर रोजी उमरखेड येथे होणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित व्हा - रामभाऊ सूर्यवंशी

हिमायतनगर प्रतिनिधी/ हिंगोली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या उमरखेड या ठिकाणी दि सात डिसेंबर 2023 रोजी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची भव्य सभा होणार आहे या सभेला मराठा समाज बांधवांनी लाखोंचा सखेने उपस्थित होऊन मराठा समाजाची एकजूटता दाखवून द्यावी असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रामभाऊ सूर्यवंशी यांनी केली आहे

मराठ्यांचे क्रांतीसूर्य मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांची गो.सी.गावंडे महाविद्यालय उमरखेड येथे दिनांक 07/12/2023 रोज गुरुवारी सकाळी 10 वाजता मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी जाहीर सभेचे आयोजित करण्यात आली आहे, त्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात मराठा समाज बांधवांमध्ये जनजागृती करण्यासाठी व सभेचे आमंत्रण व चर्चा करण्यासाठी हिमायतनगर तालुक्यातील गावो गावी बैठक घेण्यात येत आहे, त्यापैकी पळसपुर, डोल्हारी, शिरपल्ली, शलोडा, यकंबा, कोठा, घारापुर, दिघी, टेंभुर्णी, विरसनी, पिंपरी, कामारी, वाघी,  सरसम, करंजी, दुधड, जवळगाव आदी ठिकाणी भेट देऊन माहिती देण्यात आली आहे, 

तर आज चौथा दिवस. हिमायतनगर तालुक्यातील खडकी, सोनारी, पोटा (बु), पोटा (खु), पारवा (खु), खेरगाव, कामारवाडी, सवना... येथे मराठा समाज बांधवाचा भेटी घेऊन माहिती दिली जाणार आहे एकूणच उमरखेड येथे होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आली असून या सभेला लाखोच्या संख्येत समाज बांधवांनी उपस्थित राहून मराठा आरक्षणाचा लढा पुढे रेटून न्यावा असे आवाहन सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा सेवक रामभाऊ सूर्यवंशी यांनी केले आहे, शहराच्या ग्रामीण भागात जनजागृती सभेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून लाखोच्या संख्येत ही सभा होणार असल्याचेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.