हिमायतनगर प्रतिनिधी / स्व. भाऊसाहेब माने तालुकास्तरावरील आदर्श-शिक्षक व उत्कृष्ट कर्मचारी पुरस्काराने शिक्षक गोविंद कोरपकवाड यांचा गौरव करण्यात आला आहे.
उमरखेड तालुक्याचे शिक्षण महर्षी भाऊसाहेब माने यांनी आमदार, पं. स. चे पहिले सभापती, सहकार.समाजकारण या क्षेत्रामध्ये दीपस्तंभा सारखे काम केले. म्हणून त्यांच्या नावे पं. स. उमरखेड च्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षक गोविंद व्यंकटराव कोरपकवाड यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला आहे.
शिक्षक म्हणून आदर्श कार्य केल्याबद्दल स्मृती चिन्ह शाल श्रीफळ देऊन गौरवण्यात आले आहे. हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील भुमिपूत्र शेतकऱ्यांचा मुलगा गोविंद कोरपकवाड यांनी गरिब परिस्थिती शिक्षण पूर्ण केले आज आदर्श पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
शिक्षक गोविंद कोरपकवाड यांचा सन्मान आ. गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे, सहायक गटविकास अधिकारी गजानन पलेवाड, गटशिक्षणाधिकारी सतीश दर्शनवाड, सौ. वानखेडे, भाऊसाहेब माने गौरव कृती समितीचे अध्यक्ष प्रविण सुर्यवंशी, सचिव बालाजी वानखेडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षक- कर्मचारी सन्मान सोहळा संपन्न झाला. शिक्षक गोविंद कोरपकवाड यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले याबद्दल कारला ग्रामस्थांनी अभिनंदन कौतुक केले आहे.
सोपान बोंपीलवार हिमायतनगर
