हिमायतनगर भाजपा उपाध्यक्षपदी लक्ष्मण ढाणके यांची निवड...

हिमायतनगर प्रतिनिधी/ भारतीय जनता पक्षाच्या तालुका संघटनात्मक कार्यकारीणी करण्यात आली यामध्ये उपाध्यक्षपदी लक्ष्मण ढाणके यांची निवड करण्यात आली असून त्यांच्या निवडीबद्दल अभिनंदन कौतुक होत आहे. 

   हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील बजरंग दलचे अध्यक्ष लक्ष्मण ढाणके यांनी सामाजिक कार्यासह धार्मिक कार्यात सहभागी होऊन आपले काम केले. त्या कार्याची दखल घेत भारतीय जनता पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष म्हणून लक्ष्मण ढाणके यांची निवड  तालुकाध्यक्ष गजानन चायल यांनी केली आहे.गावपातळीवर लक्ष्मण ढाणके यांनी शिवसेना पक्षाचे काम एकनिष्ठ पणे केले होते . 
शिवसेना पक्षातील पदाधिकारी यांच्या निशक्रीयतेमुळे पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.ढाणके यांच्यामुळे येणाऱ्या निवडणूक काळात कारला गावातून शिवसेनेला धक्का बसणार हे निश्चित आहे. लक्ष्मण ढाणके यांच्या भाजपा निवडीबद्दल भाजपाचे मराठवाडा संघटन मंत्री संजय कौडगे, जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर, जिल्हा सरचिटणीस गजानन तुप्तेवार, तालुकाध्यक्ष गजानन चायल, यांनी अभिनंदन केले आहे. कारला गावातून देखील त्यांचा सत्कार अभिनंदन करण्यात आले आहे. गावातील समर्थक लवकरच लक्ष्मण ढाणके यांच्या सोबत मोठ्या संख्येने भाजपा प्रवेश घेणार असल्याचे सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.