हिमायतनगर प्रतिनिधी/ तिर्थक्षेत्र बोरगडी येथे वै. साहेबराव कृष्णा यांच्या19 व्या पुण्यस्मरणा निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ हरिकीर्तन महोत्सव हनुमान मंदिर प्रांगणात सुरू असुन भक्तीमय सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी येथील . साहेबराव कृष्णा यांच्या19 व्या पुण्यस्मरणा निमित्त ग्रंथराज ड ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ हरिकीर्तन महोत्सव दि. 4 आक्टोबर पासून सुरूवात झाली असुन हा अखंड सोहळा 11 आक्टोबर पर्यंत चालणार आहे. या कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी पारायण, संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन सुरू आहेत. किर्तनकार ह. भ. प. लक्ष्मण महाराज बोरगडीकर, ह. भ. प लक्ष्मण महाराज धानोरकर,ह. भ. प. डॉ. लक्ष्मीकांत रावते, ह. भ. प.संतोष महाराज,ह. भ. प.पंजाब महाराज चालगणीकर, ह. भ. प.भिमराव महाराज फुटाणकर, ह. भ. प.निळोबा महाराज हरबळकर यांची किर्तन सेवा सुरू आहे. दि. 11 आक्टोबर रोजी 8 ते 10 ह. भ. प.निळोबा महाराज हरबळकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे. बालयोगी व्यकंटस्वामी महाराज पिंपळगाव यांची उपस्थित असणार आहे. या भक्तिमय सोहळ्याचा लाभ पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन ह. भ. प. माधव बुवा बोरगडीकर व ग्रामस्थांनी केले आहे.
