वृक्ष हे मानवी जिवनाचा आधार असुन ती जगली तरच मनुष्य जगेल - तहसीलदार आदित्य सेंडे

हिमायतनगर प्रतिनिधी(सोपान बोंपीलवार) मानवी जीवनात झाडांचे महत्व विशेष आहे. झाडे मनुष्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत, ती मनुष्य जीवनाची आधार आहेत. याशिवाय पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्षांचे महत्त्व भरपूर आहे.परंतु आज मानवाने आपल्या नवनवीन शोधांच्या अभिलाषेमुळे पर्यावरणाला नुकसान पोहचवणे सुरू केले आहे. अश्या काळात पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज झाली असल्याचे तहसीलदार आदित्य शेंडे यांनी सांगितले आहे. हिमायतनगर येथील पंचायत समिती सभागृहात आजादी का अमृत महोत्सव निमित्त मेरी माटी मेरा देश, अमृत कलश , आणि ग्रामपंचायत ने 75 झाडे लावून वृक्षारोपन करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले होते.त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी उदिष्ट वेळेत पुर्ण केले.आणी अमृत कलशाची सुंदर सजावट करून पंचायत समिती प्रशासनाच्या स्वाधीन केले असता कलश पाहून सभागृहात भक्तीमय वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले.ग्रामसेवकांनी केलेल्या उपक्रमाचे तहसीलदार यांनी कौतुक केले. 
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार आदित्य शेंडे, प्रमुख पाहुणे गटविकास अधिकारी कैलास बळवंत, विस्तार अधिकारी प्रमोद टारपे होते.याप्रसंगी बोलताना तहसीलदार शेंडे म्हणाले की वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असुन अधिकच्या वृक्ष तोडीमुळे नुकतेच कोरोना काळात ऑक्सीजनचा तुटवडा जाणवला.झाडे कमी होत असल्यामुळे निसर्गाची अवकृपा होते त्यामुळे शेतीकरिता पुरेसा पाऊस पडत नाही, नापिकी होते त्यामुळे प्रत्येक नागरीकांनी एक झाड लावले तर भविष्यात पाणी कमी पडणार नाही वृक्षतोडीमुळे झाडे नाहिसे होत असल्याची बाब भविष्याकरीता चिंताजनक आहे .त्यामुळे प्रत्येक नागरीकांना वृक्षारोपण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.यावेळी ग्रामविकास अधिकारी सैलेश वडजकर,भोगे,कासटवार,नारायण काळे, शिरारपलू, संघटना सचिव आनंद कदम,सटलावार,पुपलवाड,अभियंता नालंदे, विशाल पवार, कोमलवार ,वाघमारे,सुर्यवंशी,स्वप्नील भद्रे, सोनटक्के, सरपंच मारोती वाडेकर, गौतम दवणे, सोपान बोंपीलवार यांच्यासह ग्रामसेविका, सरपंच, पंचायत समिती चे कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी नारायण काळे यांनी केले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.