हिमायतनगर प्रतिनिधी /- शहरातील श्री परमेश्वर मंदिर देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्य यात्रा महोत्सव भरवला जातो त्या यात्रा महोत्सवाची सुरुवा दिनांक 18 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री पासून सुरूवात झाली असून शनिवारी परमेश्वर दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. अनेक भक्तांनी दर्शन घेतले आहे.
मागील दोन वर्षाच्या कोरोना काळानंतर श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी यात्रा महोत्सव यावर्षी अनेक स्पर्धेने होणार आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने परमेश्वर मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष तथा तहसीलदार एन.डी.गायकवाड व मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ यांच्या हस्ते येथील श्री परमेश्वर महाराज यांचा जल अभिषेक व महाआरती करण्यात आली आहे.
. यावर्षी परमेश्वर मंदिर परिसराचे नव्याने सुशोभीकरण झाल्याने आंध्रप्रदेश, विदर्भ, मराठवाड्यातून असंख्य भाविक भक्त हजारोच्या संख्येने महाशिवरात्रीनिमित्त दर्शनासाठी आले होते. आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी दर्शन घेऊन भाविकांना महाशिवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांचा मंदिर ट्रस्ट कडून सत्कार करण्यात आला आहे.
ओम शांती सेंटर देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकात्मक मूर्तीचे भव्य देखावे सादर करून त्यांचे दिव्य दर्शन सुद्धा श्री परमेश्वर मंदिर देवस्थान कमिटी कडून आयोजित केले होते यावेळी बजरंग दल शाखेकडून करण्यात आले होते. परमेश्वर दर्शनासाठी अलोट गर्दी करणाऱ्या भाविक भक्तांना उपवासाकरीता फराळ व महाप्रसादाचे वाटप करण्यात आले .
यावेळी मंदिर कमिटीचे अध्यक्ष विद्यमान तहसीलदार गायकवाड साहेब ,उपाध्यक्ष महावीर शेठ श्रीश्रीमाळ ,सचिव अनंता देवकते, ज्येष्ठ नागरिक तथा सदस्य लक्ष्मणराव शंक्करगे, भास्कर चिंतावार, मुलंगे, संचालक शांतीलाल श्रीश्रीमाळ, विलास वानखेडे, संजय माने अनिल मादसवार, गजानन मुत्तलवाड सह परमेश्वर मंदिर कमिटीचे सर्व संचालका सह गावातील प्रतिष्ठित नागरिक व कमिटीचे सदस्य यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहून परिश्रम घेत आहेत दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांच्या सोयी सुविधेसाठी त्यांची व्यवस्था केली होती.
