हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील बाजार चौक मध्ये असलेल्या हनुमान मंदिरात बुधवारी श्री दत्त जन्मोत्सव टाळ मृदगं हरिनामाच्या गजरात मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला आहे.
शहरातील पोलीस ठाण्या समोर असलेल्या हनुमान मंदिरात बुधवारी दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.दत्तमंदिरामध्ये भजन, कार्यक्रम आयोजीत दत्तगुरूंची पूजा, धूप, दीप व आरती करून मोतीचुर चा प्रसाद वाटप करण्यात आला आहे. दिगंबरा दिगंबरा श्री पाद वलभ दिगंबरा च्या जयघोष करून मोठ्या भक्तीभावाने जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
या भक्तीमय कार्यक्रमात कांतागुरू वाळके, शाम ठाकूर, ज्योतीबाई बेदरकर, फुलके महाराज, यांनी टाळ मृदगांची साथ केली. यावेळी पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर, शांतीलाल श्रीश्रीमाळ,बाळू चवरे, डॉ आनंद माने, संतोष पळशीकर, शंकर पाटील वानखेडे, अमोल कोटुरवार,ज्ञानेश्वर बास्टेवाड,यांच्यासह महिला भक्तांनी पाळणा सादर करून जन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे.
