हिमायतनगर प्रतिनिधी/ नांदेड जिल्ह्यात भारत जोडो यात्रेचे पदार्पण होताच खा राहूल गांधी यांची भेट घेण्यासाठी अनेकांनी यात्रेत सहभाग नोंदवला होता. याच यात्रेत जवळगाव येथील दोन्ही पायाने अपंग असलेल्या शेख इम्रान यांच्याकडे राहूल गांधी यांचे लक्ष गेले यातच राहूल गांधी यांची भेट झाल्याचा आनंद झाला असल्याचे इम्रान यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील जवळगाव येथील अपंग तरूण इम्रान हा नांदेड मध्ये राहून एम्पीएससी ची तयारी करत आहे. भारत जोडो यात्रे दरम्यान इम्रान राहूल गांधी यांच्या भेटीकरीता यात्रेत सहभागी झाला होता. यावेळी शेख इम्रान यांची राहूल गांधी यांच्या सोबत भेट घडली राहूल गांधी यांनी इम्रान यांना दहा मिनिटे वेळ देत बोलणे झाले असल्याचा आनंद मनाला झाला असल्याचे इम्रान यांनी सांगितला आहे.
पायाने अपंग असलेल्या इम्रान यांचा शिक्षणासाठी संघर्ष सुरू आहे. दोन्ही पायांनी अपंग असलेल्या इम्रान यांना शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची मदत मिळत नसली तरी देखील त्यांनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवली असुन त्यांच्या जिद्द चिकाटीने भविष्यात यश मिळेल अशी अपेक्षा इम्रान यांनी बोलतांना व्यक्त केली आहे.
राहूल गांधी यांच्या भेटी दरम्यान त्यांच्याशी महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले , माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, संजय निरुपम, राष्ट्रवादी चे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील, खा.सुप्रिया सुळे, आमदार मोहन अन्ना हंबर्डे, आ. माधवराव पाटील जवळगावकर या नेत्यांशी बोलणे झाले असल्याचे सांगितले आहे.
