सवना ज. येथील दुचाकी चालकाचा महामार्गावर मृत्यू

हिमायतनगर प्रतिनिधी/ सवना ज. गावातील युवक शुक्रवारी रात्री  हिमायतनगर वरून सवना गावाकडे जात असताना अचानक गाडीचा तोल मुख्य रस्त्यावरून रस्त्याच्या साईड पट्यातील खदानीत गाडी जाऊन दुचाकीस्वराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. 
    

सवना (ज)येथील  संदिप सटवाजी शेंडगे हा शुक्रवारी रात्री गावाकडे दुचाकीवर जात असतांना हिमायतनगर- इस्लापुर या महामार्गावर असलेल्या महावितरणच्या 33 के. व्ही. केंद्रकाजवळ असलेल्या रस्त्याच्या साईड च्या खदानीत  एक युवक मृत अवस्थेत पडल्याचे आढळून आले. व बाजूला त्याची दुचाकी देखील पडून होती. हि घटना शनिवारी सकाळी समजली.मुख्य रस्त्यावरून जाणारे अनेक वाहने थांबवून बघीतले असता सदरील युवक हा सवना येथील असल्याचे निदर्शनास आले असता घटनेची माहिती त्यांच्या नातेवाईकांना दिली.  सदरील घटनेची माहिती मयत युवकाच्या चुलते बालाजी शेडंगे यांनी पोलीसात दिली ग्रामीण रूग्णालयात प्रेताचे श्वेच्छेदन करून प्रेत नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.या घटनेतील मयत युवकाच्या पश्चात  आई, वडील, पत्नी ,  एक मुलगा, एक मुलगी,असा  परीवार आहे.त्याच्यावर सवना येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे सवना गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.