हिमायतनगर प्रतिनिधी/ महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक अतिवृष्टीने हिमायतनगर तालुक्यात रेकार्ड ब्रेक तोडले आहे. अधिकारी कर्मचारी वर्गाना सोबत घेऊन अतिवृष्टी चा प्रत्यक्ष आँखो देखा हाल विधानसभा क्षेत्रातील हदगाव ,हिमायतनगर तालुक्यात फिरुन पाहिला आहे.
राज्यातील सतेत बदल झाल्यानंतर दिवसभर पाहिलेला अहवाल रात्रीचा दिवस करून लागलीच दुसऱ्याचं दिवशी राज्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करून अहवाल सादर केला होता.अतिवृष्टिमुळे शेतकऱ्यांवर ओढावलेल्या नैसर्गिक आपतीतुन सावरण्यासाठी त्याच पद्धतीने अनुदान देण्याची मागणी केली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.विपीन ईटनकर, उपविभागीय दंडाधिकारी ब्रिजेश पाटील यांच्या सह तालुका पातळीवरील तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या अधिपत्याखाली सर्वंच विभागाच्या अधिकारी, कर्मचारी वर्गाने प्रामाणिक नुकसानीची पाहणी करण्याचे काम केल्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेल्या अनुदानात आपल्या तालुक्यात नुकसानी प्रमाणात सर्वाधिक अनुदान मिळण्यास यश आले आहे.शेतक-यावर ओढावलेल्या समस्या स्वतः शेतकरी असल्यामुळे किती,कसे नुकसान झाले हे स्वतः वेळ मिळेल तेव्हा सतत शेतावर जात असल्याने सर्व बाबींची जाणीव असल्यामुळे शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासनाकडून मदत मिळविण्याच्या प्रयत्नांना आपल्या सर्वांचे सहकार्याने यश आल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर बोलताना सांगितले.
विजेसह रस्त्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करणार.... अत्तिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांची हानी झाली असुन शेतकऱ्यांना पाणी भरपूर झाल्यामुळे रब्बी हंगाम तरी कसा सावरेल यांवर शेतकरी अवलंबून आहेत. रब्बीसाठी बि बियाणे शासनाकडून मिळतील का यासाठी देखील प्रयत्न केले जाणार आहेत.विशेष म्हणजे अनेक गावच्या शेतकरी बांधवांचा विजेचा प्रश्न आहे.जिल्हानियोजनाची बैठक पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.या बैठकीत ट्रान्सफॉर्मर सह विज वितरण कंपनी साठी अधिका अधिक तरतुदी साठी प्रयत्न करुन विजेचा प्रश्न सोडवणार असल्याचे सांगितले आहे.
