टाटा मॅजिक च्या धडकेत गुळाची चहा वाला युवा दुचाकीस्वार स्वार जागीच ठार-

हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील परमेश्वर मंदिर कॉम्प्लेक्स मधील गुळाची चहा विकणारा युवा प्रदिप जाधव( वय२४)   ( रा.ईस्लापुर सर्कल मधील   परोटी तांडा  ) हे दिवसभर व्यवसाय करुन सायंकाळी परोटि तांडयाकडे  जात असताना शहरातील हिमायतनगर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील   ऊमचौकात टाटा मॅजिक या चार चाकी वाहनाने  दुचाकी ला धडक दिल्याने जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना १० आक्टोबर सोमवारी रात्री ७.३० च्या दरम्यान घडली आहे.     

                                   अवघ्या काही महिन्यांपूर्वी प्रदिप जाधव यांनी गुळाचा चहा हा व्यवसाय सुरू केला होता.स्वभावाने अतिशय शांत संयमी, कष्टाळू व्यक्तीमत्व म्हणून     काही दिवसातच परमेश्वर मंदिर परिसरासह आजुबाजुला प्रसिद्ध झाला होता.व्यवसायाने देखील चांगलीच झेप घेतली होती.ऐन ऊमेदिच्या काळात अपघातात निधन झाल्यामुळे शहरासह परोटि भागात हळहळ व्यक्त होत आहे.मृतदेह ग्रामीण रुग्णालयात आणला असुन प्रेताची ऊतरणीय तपासणी ११ आक्टोबर रोजी सकाळी होणार आहे. टाटा मॅजिक पोलिस स्टेशन जमा करण्यात आली आहे.चालक फरार असून पोलीसांनी घटना स्थळी भेट देऊन ईनवेस्ट पंचनामा केल्याचे पोलीस कर्मचारी नागरगोजे यांनी  बोलताना सांगितले.   परोटि येथील माजी सरपंच प्रकाश जाधव यांचा अपघात ग्रस्त प्रदिप जाधव हा  मुलगा आहे.त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे
........ हिमायतनगर किनवट राष्ट्रीय महामार्गावरील काम मंदगतीने चालू असल्याचे सर्वश्रूत आहे. शहरातील डीवायडर गायब असल्यामुळे असे अपघाता होत आहेत.केवळ गुंतेदाराच्या निष्काळजी पणामुळे हा अपघात झाल्याची चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.