हिमायतनगर प्रतिनिधी / पदवी ही केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून यामुळे यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग सापडतो तसेच स्वतःचे आत्मपरीक्षण स्वतःच केले पाहिजे, आपण घडलो आता समाज घडला पाहिजे
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयात "पदवी प्रमाणपत्र वितरणाचा कार्यक्रमात बोलतांना माजी मंत्री अध्यक्षा सूर्यकांताताई पाटील यांनी व्यक्त केले आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री तथा मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सूर्यकांताताई पाटील ह्या उपस्थित होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापिका, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. तथा माजी सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड, विभाग नांदेड. डॉ. शैला सारंग उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थिती म्हणून मराठवाडा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सचिव श्री अरुण कुलकर्णी व महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते तसेच परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ.गजानन दगडे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ व हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलणाने झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते यांनी केले त्यात त्यांनी पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ ची पार्श्वभूमी व महाविद्यालयाच्या यशस्वीतेचा आलेख मांडला, त्यानंतर सर्व पदवीधारक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तदनंतर प्रमुख अतिथी प्राध्यापीका डॉ.शैला सारंग यांनी पदवी प्राप्त केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक करत तुमच्या खऱ्या आयुष्याची सुरुवात आता झाली असून या स्पर्धेच्या जीवनात थांबला तो संपला यांची जाणीव करून देत चांगले जीवन जगण्याचा मार्ग असल्याचे सांगितले,
तर अध्यक्षीय समारोप प्रसंगी बोलताना
श्रीमती सूर्यकांताताई पाटील यांनी पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या प्रज्ञा प्रतिभावंतांचा गुणगौरव करून अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन करताना, पदवी ही केवळ नोकरी मिळविण्याचे साधन नसून यामुळे यशस्वी जीवन जगण्याचा मार्ग सापडतो तसेच स्वतःचे आत्मपरीक्षण स्वतःच केले पाहिजे, आपण घडलो आता समाज घडला पाहिजे तसेच देशासमोर उभे असलेल्या वेगवेगळ्या आव्हानांची जाणीव पदवीप्राप्त तरुणाईला करून देत पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी दहा झाडे लावून इतरांना दहा झाडे लावण्यासाठी प्रेरित करावे असे आव्हान करीत समाजात प्रभावी व्यक्तिमत्त्व बनण्यासाठी अखंड साधना करावी लागते असे हृदयस्पर्शी व बहुमूल्य मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतिहास विभाग प्रमुख प्रा.डॉ. वसंत कदम यांनी केले तर उपस्थितांचे आभार.परीक्षा विभाग प्रमुख प्रा.डॉ. गजानन दगडे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली सदरील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
