आदित्य देवराये यांचा कामारी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार संपन्न

कामारी गावाचे भूमिपुत्र आदित्य संतोष देवराये यांनी नीट परीक्षा 2022 मध्ये 720 पैकी 675 गुण घेऊन नेत्रदीपक यश प्राप्त केले आहे. आदित्यने बायोलॉजी मध्ये 360 पैकी 355 गुण घेऊन यशाची उंच भरारी घेतली आहे.त्याने पाहिल्याच प्रयत्नात त्याने हे यश प्राप्त केले आहे. 
त्याच्या यशाबद्दल कामारी येथील गावकऱ्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला. कामारी गावाचे श्रद्धास्थान श्री संत संभाजी महाराज यांच्या सप्ताह सोहळयात, हदगाव हिमायतनगरचे लोकप्रिय आमदार माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांच्या शुभहस्ते हा सत्कार करण्यात आला.याप्रसंगी मठाधिपती भागवत महाराज पेटकर यांच्यासह अनेक महाराष्ट्रातील अनेक संत मंडळी,गावकरी मंडळी तसेच पंचक्रोशीतील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
 बालपणापासून अतिशय तल्लख बुद्धिमत्ता असणाऱ्या आदित्यने यापूर्वी चौथी स्कॉलरशिप मेरिट, आठवी कॉलरशिप मेरिट, एमटीएस मेरिट, डॉक्टर होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, गणित संबोध परीक्षा, एनटीएस यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षेत उज्वल यश संपादित केले आहे.त्याला दहावी परीक्षेत 99.20% गुण मिळाले होते. 
देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या काहीशा आव्हानात्मक समजल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत आदित्यने मोठे यश प्राप्त केले आहे. एम्समध्ये डॉक्टर होण्याचे स्वप्न असणाऱ्या आदित्यला भविष्यात प्रशासकीय सेवेत जायचे आहे. 
आदित्यने गावाचे नाव मोठे केल्याच्या भावना ग्रामस्थानी यावेळी व्यक्त केल्या. गावातील तरुण पिढीने आदित्य पासून प्रेरणा घ्यावी अशी भावना आ.माधवराव पाटील जवळगावकर साहेब यांनी व्यक्त केली.
सत्कार सोहळ्यासाठी अशोकराव शिरफुलें,गणेश देवराये,धोंडुराम सूर्यवंशी,अमोल पाटील देवराये,रुपेश शिरफुलें,संतोष देवराये,दिगंबर शिरफुलें,सुनील शिरफुलें,शुभम शिरफुलें केरबा देवराये,आनंद देवराये,कृष्णा चुकारे......
आदीने विशेष पुढाकार घेतला.
 आदित्यने आपल्या यशाचे श्रेय गुरुजन व आई वडिलांना दिले आहे. आदित्य देवराये हा सेवानिवृत्त सहकार अधिकारी माणिकराव पाटील देवराये यांचा नातू, प्रख्यात वक्ते तथा शिवशंभू चरित्राचे अभ्यासात प्रा. संतोष देवराये यांचा पुत्र, तर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन देवराये यांचा पुतण्या आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.