हिमायतनगर प्रतिनिधी ( मारोती वाडेकर)
सीमेवर लढताना आपल्या सैनिकांनी देशासाठी दिलेली सेवा अमुल्य असते. त्यांच्या ऋणातून उत्तराई होण्यासाठी नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील बरबडा येथील स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सावनिमित्त एका व्हाँट्स अँपवरील निखळ ग्रुपच्या मध्यमातून लष्करातल्या आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. येथील स्वर्गीय गोविंदरावजी धर्माधिकारी सभागहात मंगळवारी सकाळी आयोजीत केलेल्या सत्कार समारंभापुर्वी ढोलताशांच्या गजरात भारत मातेच्या जयघोशात, तिरंगाध्वज हातात घेऊन जवाहरलाल नेहरू शाळेतील स्काऊट गाईड विभागाकडून माधव गुरूजी कंडापल्ले यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. यात भारत मातेची सेवा करून निवृत्त झालेल्या व सध्या सेवेत असलेल्या पंचक्रोशीतील २७ जवानांचे फुलांची मुक्त उधळण करत मोठ्या हर्षोउल्हासात स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच बालाची मदेवाड, प्रमुख पाहुणे म्हणुन जवाहरलाल नेहरू शिक्षण समितीचे अध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी, सरपंच माधवराव कोलगाने, शिवाजीराव धर्माधिकारी, मौलाना हिराज शेख आदींची उपस्थिती होती. जवाहरलाल नेहरू विद्यालयातील सन १९९०-९१ मधील इयत्ता १० वी मधल्या विद्यार्थ्यांनी व्हाट्सअँप ग्रुपच्या माध्यमातून नाविण्यपुर्ण उपक्रम हाती घेऊन सैनिकांचा सन्मान सोहळा आयोजीत केला होता. सैनिकांप्रती आपले प्रेम, आपुलकी व्यक्त करण्याचा कौतुकास्पद उपक्रम असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. मौलाना हिराज शेख यांच्या भाषणाने उपस्थितांची मने जिंकली. हा सोहळा केवळ देशाच्या सैनिकांसाठी आयोजीत केला असून या कार्यक्रमाची मुळ संकल्पना एका मुस्लिम बांधवाचीच असल्याने याचा मला गर्व वाटतो.
कार्यक्रमातील एका सैनिकाच्या पत्नीने गायलेल्या गीताचा संदर्भ देत प्रत्येक सैनिकाची पत्नी सीमेवर जाताना डोळ्यात अश्रू आणून आपल्या पतीला सांगते तुम्ही सीमेवर जाऊन देशाचं रक्षण करा, आमचं रक्षण करायला ईश्वर आहे अशी भावूक साद आपल्या सैनिक पतीला घालते. आपल्या परिवाराचा त्याग करून सैनिक सीमेवर लढतो. त्यांच्या विषयी बोलायला शब्द कमी पडतील, अशा भावना मौलाना हिराज शेख यांनी व्यक्त करत निखळ मित्र या व्हाटसअँप ग्रुपचे कौतुक केले.
निखळ ग्रुपचे सदस्य असलेले माधवराव सर्जे यांच नुकतचं निधन झाल्याने त्यांच्या कुटूंबाला आर्थिक मदत म्हणुन रोख ३० हजार रूपये त्यांच्या मुलाकडे सुपूर्द करण्यात आले. आजी-माजी सैनिकांत मलू नागधरे, गोविंद सुरणे, संजय गुंटे, मारोती मदेवाड, बाबन इंद्रवाड, ओमकार कुंभारगवे, मुकुंद ढवळे, दिलीप भुत्ते, आनंद हनमंत्ते, माधव मदेवाड, खयुम बेग, कु. पुजा भुसलवाड, विलास ढवळे, नागोराव ढवळे, राजू हनमंते, भगवान लांडगे, संजय ढुमणे, विठ्ठल शिंदे, संजय तोडे, सचिन इंद्रवाड, विठ्ठल रेडेवाड, कोंडराव चिकाळकर, दत्ता धुमाळे, श्रीकांत शिंदे, दशरथ कनेवाड,यांचा होता काही सैनिक उपस्थित नसल्याने त्यांच्या नातेवाईकांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान भारतीय सैन्यातील २७ आजी-माजी सैनिकांचा दिमाखदार सन्मान सोहळाचा पुढाकार मुख्याध्यापक दिगांबर माने, विल्याज बेग, सहशिक्षक माधव वटपलवाड, शिवराम आनेमवाड, सतीष व्यंकटपुरवार, आजमोद्दीन शेख,भगवान राक्षसमारे, बालाजी पासेमवाड, व्यंकटी शिंदे, भगवान शिंदे, आनंदराव हांबर्डे, साहेबराव सुरेवाड, ग्रामसेवक नारायन शिंदे, दिलीप जेटेवाड, गोविंद बडुरे, विश्वांबर कंदलवाड, कोंडीबा हसेवाड, सुरेश पवार, हनसाजी सर्जे, सरपंच मारोती वाडेकर, नागशेन वाघमारे यांच्यासह निखळ गुपच्या मित्र परिवाराकडून करण्यात आला.
