आंबेडकरी चळवळीतीचे नेते सुरेशदादा गायकवाड यांच्या हस्ते सरपंच मारोती वाडेकर यांचा सत्कार

हिमायतनगर प्रतिनिधी/ आंबेडकरी चळवळीचे नेते, दैनिक शिल्पकार चे संपादक सुरेश दादा गायकवाड यांचे विश्वासू म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक काम करणारे मारोती वाडेकर हे पळसपुर गावचे सरपंच झाल्याबद्दल त्यांचा नांदेड येथील विश्रामगृहावर सुरेश दादा गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी सुरेश गायकवाड म्हणाले की समाजातील गोरगरिबांना न्याय देऊन सामान्य जनतेची सेवा केल्यामुळे मारोती वाडेकर सरपंच होऊ शकले असेच समाज कार्य आपल्या कार्यकर्त्यांनी केले पाहिजे संघर्षातून मारोती वाडेकर सरपंच झाले असून अशा कार्यकर्त्यांचा अभिमान असल्याचेही ते म्हणाले. 

नांदेड येथील विश्रामगृहा मध्ये फुले शाहू आंबेडकर चळवळीचे भाष्यकार तथा प्रजासत्ताक पार्टीचे नेते. दैनिक शिल्पकारचे मुख्य संपादक आदरणीय सुरेश दादा गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दलित पॅंथर रोप्य महोत्सव संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच येणाऱ्या महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका सुद्धा प्रजासत्ताक पार्टीच्या नावावर आपण लढविणार असल्याचे सुद्धा यावेळी गायकवाड यांनी बोलताना सांगितले. 

नवनिर्वाचित सरपंच म्हणून मारुती वाडेकर व मेथीकर यांचा सत्कार सुरेश गायकवाड, दत्ता हरी दोतरे,सुभाष दारवंडे,यांच्या हस्ते करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्राध्यापक मनोहरे सर ,पी एस गवळी , दैनिक शिल्पकार चे कार्यकारी संपादक दत्ता हरी धोत्रे ,रवी दादा गायकवाड, जेडी कवडे, भुजंग सोनकांबळे ,बनसोडे. शेरासह नांदेड जिल्ह्यातील असंख्य तालुक्यातील मुख्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते ,यामध्ये हदगाव तालुक्याचे नथू चौरे आणि त्यांचे सहकारी तसेच हिमायतनगर तालुक्याचे नेते सुभाष दादा दारवंडे रवी भालेराव राजू राऊत प्रताप लोमटे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.