पर्युषण महापर्व जैनांचा सर्वात मोठा अध्यात्मिक महोत्सव क्षमा मागण्याचे आणि क्षमा करण्याचे पर्व - प्रा पगारिया

नांदेड प्रतिनिधी/ - जैन समाजाचा सर्वात मोठा अध्यात्मिक आणि धार्मीक महोत्सव म्हणजे पर्युषण महापर्व ! या पर्वाच्या आठ दिवसात तपस्या ,साधना ,सामाईक ,प्रतिक्रमण , संतांचे प्रवचन या माध्यमातून आराधना केली जाते ,अनेक ठिकाणी जैन मंदिर/ जैन स्थानक या ठिकाणी साधु/ साध्वींच्या चातुर्मासाचे आयोजन केले जाते ,जेथे साधु / साध्वी नसतात तेथे स्वाध्यायी या आठ दिवसांसाठी प्रवचन,शास्त्र. वाचन करण्यासाठी आमंत्रित केले जातात या वर्षी नांदेड जेन स्थानकात पुण्याहुन प्रा ,डॉ अशोककुमार पगारिया,अॕड पी एम् जैन, आणि जेष्ठ श्रावक श्री शांतीलाल जी फुलफगर या स्वाध्यायी बंधुंचे आगमन झाले आहे . या पर्वाच्या पहिल्या दिवशी दि २४ अॉगष्ट रोजी प्रा पगारिया यांचे पर्युषण महापर्व या विषयावर प्रवचन झाले ,ते म्हणाले " पर्युषण महापर्व " म्हणजे जैनांचा मोठा आध्यात्मिक महोत्सव,या काळात तपस्या, साधना, जप ,स्वाध्याय या माध्यमातुन आराधना केली जाते ,आपल्या पापांची कबुली देऊन ,चुकांची माफी क्षमा मागितली जाते, क्षमापना आणि क्षमायाचना करण्याचे हे पर्व '" दुसर्या दिवशी " आचार्य आनंदॠषिजी - मानवताके मसीहा या विषयॎवर माहिती पुर्ण प्रवचन झाले,त्यांनी आचार्याचा जीवनपट तपशीलवार उलगडला! नंतर " मनको केसे काबु किया जाय" या विषयावर उद्बोधक व्याख्यान झाले ! अंतगड सूत्र आणि कल्पसुत्र वाचन अॕड पी एम् जैन करीत आहेत तर प्रतिक्रमण श्री शांतीलालजी फुलफगर करवतात.कार्यक्रमाचे संयोजन संघाचे अध्यक्ष श्री ओमप्रकाशजी पोखरणा , व मनोज श्रीश्रीमाळ, महेंद्र जैन,सतीश कोठारी ,नवल पारख अजित मेहेर यांनी केले!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.