लेखन ही एक दैवी साधना होय मूख्य कार्यकारी अधिकारी सौ.वर्षा ठाकूर

नांदेड प्रतिनिधी/  लेखन ही एक दैवी साधना आहे. लेखन करण्यासाठी समृद्ध अनुभव शक्ती व विषयाचे प्रगढ ज्ञान असावे लागते. चांगल्या लेखकांची चांगली पुस्तके जीवन बदलतात. असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौ वर्षा ठाकूर (घुगे) यांनी कुंडलवाडी येथील सब्बनवार विद्यालयातील सहशिक्षक रविकांत शिंदे यांच्या जल्लाद (द हँगमन) या इंग्रजी कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यातून केले.

पीपल्स कॉलेज नांदेड येथील नरहर कुरुंदकर प्रगत अभ्यास व संशोधन केंद्रात झालेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी यशवंत महाविद्यालयाच्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका सौ. डॉक्टर पद्मा राव ह्या होत्या.
सदरील कार्यक्रमातून प्रतिथयश उद्योजक प्रसिद्ध वक्त्या व गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्षा सौ. राजश्री हेमंत पाटील यांनी रविकांत शिंदे यांच्या कादंबरी वर भाष्य करताना गुन्हेगार हा जन्मजात गुन्हेगार नसतो परिस्थिती किंवा संगत ही बऱ्याचदा त्यासाठी कारणीभूत ठरते आणि प्रत्येक गुन्हेगार हा शेवटी एक मनुष्यच असतो त्यालाही आपल्यासारख्या भावना असतात असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. पद्मा राव यांनी जल्लादचे अतिशय सुंदरपणे समीक्षण करून या कादंबरीचे व लेखकाचे अभिनंदन केले.

या कार्यक्रमास नांदेड जिल्हा परिषदेतील माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी श्री प्रशांत दिग्रसकर, भार्गव करिअर अकॅडमीचे श्री भार्गव राजे, मार्कंडेय एज्युकेशन सोसायटी कुंडलवाडी चे सचिव डॉ. प्रशांत सब्बनवार व श्रीमती विठाबाई शिंदे यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे संचालन श्री संजय केंद्रे व ऋतुजा देशमुख यांनी केले.
सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद शिरपूरकर यांनी प्रास्ताविकातून लेखकाचे परिचय करून दिले तर कु.शलाका शिंदे हिने उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमासाठी बालासाहेब कच्छवे, डॉ. बालाजी चिरडे, गुलाब वडजे, के.पि.सोने, गंगाधर रुद्रूरकर व मित्र मंडळ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.