बिलोलीत संतोष कुलकर्णी मित्र मंडळाचा अभिनव उपक्रम*

 *5000 साडी - लुगड्यांचे वाटप करून वाढदिवस लावला सत्कारणी* *शहरात उपक्रमाची चर्चा* 
 बिलोली - सोमवारी दि.1 आॕगस्ट रोजी येथील माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या मित्रमंडळींच्या पुढाकारातुन शहरातील वार्डा - वार्डात 5 हजार हुन अधिक साडी आणि लुगड्यांचे वाटप केले आणि कुलकर्णी यांचा वाढदिवस सत्कारणी लावला आहे. ज्यामुळे सार्थकी लावलेल्या या अभिनव उपक्रमाची शहरात चर्चा रंगली आहे

बिलोली येथील चे काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांचा वाढदिवस सोमवारी शहरातील हनुमान मंदीरा जवळच्या पटांगणात आ.अमरनाथ राजुरकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. यावेळी आ.राजुरकर यांच्यासह जि.प.चे माजी सभापती संजय बेळगे , जि.प.सदस्या तथा काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ.मिनलताई खतगांवकर , जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष तथा माजी जि.प.चे सभापती दिनकर दहीफळे , विजय येवनकर , बाहेती , नायगांवचे विजय चव्हाण माजी नगराध्यक्षा मैथिली कुलकर्णी , राधा पटाईत यांच्या उपस्थितीत साडी - लुगड्यांचे वाटप करण्यात आले. मंचावरील अनेकांनी कुलकर्णी यांच्या वाढदिवसाच्या आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत . वाढदिवसा निमित्त 5 हजार साडी व लुगडे वाटप करण्याची बिलोली शहरात ही पहीलीच वेळ असुन शहराच्या इतिहासात असे कधी झाले नाही. 5 यावेळी अनेकांनी पक्षप्रवेश केला .हा अभिनव उपक्रम राबवुन कुलकर्णी यांनी स्वतःचा वाढदिवस इतरांसाठी हास्य फुलवणारा केला अश्या प्रतिक्रिया शहरात उमटत आहेत.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शिवाजी पाटील पाचपिंपळीकर , माजी नगराध्यक्ष भिमराव जेठे , माजी उपाध्यक्ष मारोती पटाईत , नितीन देशमुख यांच्यासह कुलकर्णी यांचे हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कुलकर्णी मित्र मंडळाच्या पदाधिका-यांनी हा उपक्रम राबवुन यशस्वी केला आणि शेवटी भोजनदान देऊन वाढदिवसाची सांगता केली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.