व्हिस्टा कार चोरी करणारी टोळीस हिमायतनगर पोलीसांनी केले गजाआड

हिमायतनगर| पोलीस स्टेशन हिमायतनगर जिल्हा नांदेड येथे फिर्यादी देवजी मारोती माजळकर रा.वाळकेवाडी यांनी तक्रार दिली की, त्यांची चार चाकी टाटा व्हिस्टा कार क्रमांक एम एच -26-एके-२४४० ही त्यांचे मित्र शिवाजी माने रा.वाघी यांना वापरण्यासाठी दिली होती. ती व्हिस्टा कार अंदाजे २ लाख रुपये ही दि.११/०८/२०२२ चे रात्री कोणीतरी अज्ञात चोरांनी चोरुन नेली. अशी तक्रारीवरून पो.स्टे.हिमायतनगर येथे दि.१२/०८/२०२२ रोजी गु.र.न १९०/२०२२ कलम ३७९ भादवी प्रमाणे अज्ञात चोरांविरुधद गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना मिळालेल्या गोपनिय माहितीवरून कार चोरी करणारे अज्ञात
आरोपी संतोष तूकाराम करपे आणि गजानन नागोराव माने दोघे रा.मौजे वाघी ता.हिमायतनगर
जि. नांदेड यांनी ती कार चोरुन ता.लोहा येथील पेट्रोलपंपाजवळ नेवून सोडल्याचे माहिती मिळाली. यावरुन सदरची कार अंदाजे २ लाख रुपये किमतीची पोलीस स्टेशन येथे आणून गुन्हयात जप्त केली व
यातील आरोपी संतोष तूकाराम करपे आणि गजानन नागोराव माने दोघे रा.मौजे वाघी ता.हिमायतनगर हे दि.२०/०८/२०२२  रोजी जवळगाव रेल्वेस्टेशन वर असल्याची माहिती मिळाली वरुन त्यांना शिताफीने
ताब्यात घेवून विचारपूस केली.

यावेळी त्यांनी गुन्हयाची कबूली दिली आहे. कर चोरणाऱ्या त्या आरोपीस आज रोजी न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली असून, गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक बिडी भुसावर यांचे मार्गदर्शनाखाली सुरु आहे. या कार्यवाहीबद्दल पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, सहाय्यक अपर पोलीस अधिक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती अर्चना पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

सदरची कार्यवाही पोलीस निरीक्षक बी.डी.भुसनुर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि/बी.जी.महाजन,पोहेकॉ/ नामदेव पोटे ,पोहेकॉ /हेमंत चोले, पोहेकॉ/ अशोक सिंगणवाड, नापोकां /शाम नागरगोजे,चालक सफो/मिलींद कात्रे यांनी पार पाडली आहे.

--

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.