आष्टी जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश तात्काळ वाटप करा- गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे भागवत देवसरकर यांची मागणी.

प्रतिनिधी. दि.5 ऑगस्ट /यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सर्वत्र दिमाखात साजरा होत असताना आष्टी जिल्हा परिषद गटातील शालेय विद्यार्थ्यांना गणवेश परिधान करून शाळेत जाण्याच स्वप्नच ठरत आहे, शालेय विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या मोफत गणवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे, सुवर्ण महोत्सवीवर्ष 15 ऑगस्टपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप करण्यात यावे याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे अशी मागणी शिक्षणाधिकारी किसनराव फोले यांच्याकडे भारतीय जनता पक्षाचे आष्टी जिल्हा परिषद गटाचे युवा नेते भागवत देवसरकर यांनी केली आहे.

सरकारकडून समग्र शिक्षण अभियानांतर्गत अनुसूचित जाती जमाती व दारिद्र्यरेषेखालील शालेय विद्यार्थ्यांना दोन मोफत गणवेश दरवर्षी दिल्या जाते, शाळेचे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तब्बल दोन महिने लोटले आहेत, दोन महिने उलटूनही शालेय विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप झाली नाही यामुळे तालुक्याच्या शिक्षण विभागाने लक्ष देऊन आष्टी जिल्हा परिषद गटातील सर्वच केंद्रातील मुख्याध्यापकांना व शालेय शिक्षण समितीचे अध्यक्षना तात्काळ गणवेश वाटप करण्याच्या सूचना द्याव्यात सर्व विद्यार्थ्यांना 15 ऑगस्ट पर्यंत गणवेश मिळतील याची खबरदारी गटशिक्षणाधिकारी यांनी घ्यावी अशी मागणी देखील यावेळी भागवत देवसरकर यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.