हिमायतनगर शहरात ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या दुचाकीस्वारावर पोलिसांची कार्यवाही- वाहतूकीचे नियम पाळा पो. नि. भुसनुर

 हिमायतनगर प्रतिनिधी/शहरात विना परवाना दुचाकीवरून ‘ट्रिपल सीट’ फिरणाऱ्या  वाहनधारकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला असुन शनिवारी मुख्य रस्त्यावर पोलीसांनी दुचाकीस्वारांना अडवून दंड लगावला आहे. त्यामुळे आता पालकांनी देखील लहान मुलांच्या हाती दुचाकी देऊ नये अन्यथा कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर यांनी केले आहे. 

       हिमायतनगर शहरातील मुख्य कमानी पासुन ते परमेश्वर मंदिर बसस्थानकापर्यंत टुकार दुचाकीस्वार हे दररोज गाडीवर ट्रीपल बसुन मोठ्या आवाजात हार्न वाजवत स्टाईल करीत असल्यामुळे याचा अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. 

   याची दखल घेत पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर यांनी  दि. २२ जुलै रोजी हिमायतनगर पोलिसांनी शहरातील मुख्य कमानी जवळून  देऊन १३ वाहणावर कार्यवाही करून ८५०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. हिमायतनगर शहरात दुचाकीवर ट्रीपल बसुन जाणाऱ्यांना टोळक्यांना पोलीसांनी दंड लावल्यामुळे अनेक दुचाकीस्वारांना चाप बसला आहे. दुचाकी चालविणाऱ्यांनी वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करू नये अन्यथा  पोलीसांच्या कार्यवाहीस सामोरे जावे लागणार असल्याचे पोलीस निरीक्षक भुसनुर यांनी सांगितले आहे. या मोहिमेत
 सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन,नंदलाल चौधरी, बिट जमादार अशोक सिंगनवाड,पोलीस कर्मचारी मेडके , कुलकर्णी,नितीन राठोड,  साखरे, आउलवार  यांच्यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.