गेल्या आठ दिवसापासून तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वडगाव (ज) येथील पुलावरून पाणी असल्यामुळे येथील नागरीकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. शनिवारी खा. हेमंत पाटील यांनी येथे भेट देऊन पुलासह शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. व तात्काळ शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळाली पाहिजे असे निर्देश प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे.
हिमायतनगर तालुक्यातील वडगाव (ज) येथील पुलाची उंची कमी असल्यामुळे येथील नागरीकांना पावसाळ्यात धोका निर्माण होत आहे. गेल्या वर्षी एका शेतकऱ्यांचा पुलावरून जातांना वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यामुळे येथील नागरीकांनी या पुलाची मागणी केली आहे. अद्यापही काम झाले नाही. या वर्षी देखील झालेल्या अतिवृष्टीमुळे वडगाव येथील नागरीकांचा आठ दिवसापासून संपर्क तुटला होता.
या पुलाची उंची वाढवून देण्याची शिवसेना युवा अध्यक्ष सरपंच विशाल राठोड यांनी खा. हेमंत पाटील यांच्या कडे मागणी केली होती.शनिवारी खा. हेमंत पाटील यांनी अतिवृष्टी झालेल्या भागाचा दौरा केला.वडगाव येथे भेट देऊन पुलाची व शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. येथील पुलाच्या समस्या ग्रामस्थांनी खा.हेमंत पाटील यांच्याकडे मांडल्या दरवर्षी नागरीकांना अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराचा सामना करावा लागत आहे. याबरोबरच या भागातील शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेले पिके देखील उगवले नाहीत पुराच्या पाण्यामुळे जमिनीवर गाळ ऐऊन पिके गाळात अडकले असल्यामुळे शंभर टक्के नुकसान झाले आहे. उपस्थित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार अवधाने, तालुका कृषी अधिकारी यांना सरसकट मदत देण्याच्या सूचना केल्या आहेत. यावेळी सरपंच विशाल राठोड, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, प्रकाश रामदिनवार,विठ्ठल ठाकरे, दत्ता पाटील हगंरगे, अंकुश लकडे, देवानंद सुर्यवंशी, साहेबराव खुणे, लक्ष्मण ताडकुले, तुकाराम शिंदे, बालाजी बेळगे, यांच्यासह शेतकरी , शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
