हिमायतनगर तालुक्यातील एकही शेतकरी सर्वेक्षणातून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्या-आ. जवळगावकरांच्या प्रशासनाला कडक सुचना

हिमायतनगर प्रतिनिधी/ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केलेल्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले त्यामुळे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. प्रशासनाकडून सर्वेक्षण होत असतांना एकाही शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये एकही शेतकरी वंचित राहिला नाही पाहिजे अशा कडक सुचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना केल्या आहेत. 
      तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टीमुळे पैनगंगा नदी काठच्या कामारी,पळसपुर, डोल्हारी, सिरपली,कौठा ,तांडा या गावांना भेटी देऊन अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकांची व घरांची पडझड झाली असून शुक्रवारी पाहणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले असुन दुबार पेरणी केलेली पिके देखील पुर्णपणे गेली आहेत. प्रशासनाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे प्रशासनाकडून सर्वेक्षण होत असतांना एकाही शेतकऱ्यांवर अन्याय झाला नाही पाहिजे पंचनामे करतांना एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करून उपस्थित तहसीलदार अवधाने, ,तालुका कृषी अधिकारी शेन्नेवाड,नायब तहसीलदार तामसकर, पोलीस उपनिरीक्षक महाजन, विस्तार अधिकारी चिंतावार, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, सभापती डॉ. प्रकाश वानखेडे, जनार्दन ताडेवाड,शेख रफिक भाई, शहराध्यक्ष संजय माने,संतोष पाटील शिंदे, योगेश चिलकावार, माजी सभापती वामनराव वानखेडे, डोल्हारी सरपंच सुनिता माने,कौठा सरपंच गौतम दवणे, ओमप्रकाश पाटील, रमेश पाटील, विनायक वटटवाड, दिलीप साळवे, बालाजी कदम, शामराव टोकलवाड, शिवाजी हुंबे, यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.