नांदेड / दि 08 : दिनांक 05.04.2022 रोजी नांदेड शहरातील प्रसिध्द बांधकाम व्यवसायीक संजय बियाणी यांची गोळया झाडून हत्या झाली होती. त्या अनुषंगाने त्यांचे हत्येचे मारेकरी शोधण्या करीता विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे. सदर गुन्हयाचे तपासा संबधाने नांदेडच्या जनतेला आवहन करण्यात आले आहे की, कांही गोपनीय माहिती मिळाल्यास पथक प्रमुख श्री. विजय कबाडे, अपर पोलीस अधिक्षक भोकर तथा विशेष तपास पथक अधिकारी यांचेशी
सदरील मोबाईल व व्हॉटसअप 8668510527 क्रमां क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. तसेच त्यांना योग्य ते बक्षीस देण्यात येईल. असे आवाहन नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आले आहे.
#Playmarathinews #Nanded #police
