हिमायतनगर प्रतिनिधी/- २०१३ मध्ये आयएनएस विक्रांत ला वाचवण्यासाठी किरीट सोमय्याने मोहीम सुरू केली होती त्यास केंद्र आणि राज्य सरकारांनी असमर्थता दर्शवल्याने किरीट सोमय्या पुढे आले आणि राज्यातील जनतेकडून प्रचंड निधी गोळा केला. त्यासाठी रेल्वे स्थानकांवर, विमानतळावर डबे घेऊन उभा राहिला. आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्याने महाराष्ट्र राज्याच्या लोकांनी त्याला मदत केली होती आयएनएस विक्रांत च्या नावाखाली गोळा केलेल्या निधीच झालं काय असा प्रश्न उपस्थित केला असता तो निधी राजभवनात सुद्धा जमा झाला नसल्याचे माहिती अधिकारा खाली कळाले तेव्हा लोकांच्या देशप्रेमाशी खेळून किरीट सोमय्याने गद्दारी केली आहे त्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला हवा ह्यासाठी दि 7 एप्रिल रोजी श्री परमेश्वर मंदिर समोर हिमायतनगर शिवसैनिकांनी त्यांच्या पुतळ्याला जोडे मारून आंदोलन केले व हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत मा.तहसिलदार यांना निवेदन दिले
या प्रसंगी बोलताना माजी आमदार नागेश पाटील यांनी असे सांगितले की आयएनएस विक्रांत हा देशाच्या दृष्टीनं अभिमानाचा विषय असल्याने त्यांच्या नावे जमा केल्या निधी मध्ये अंदाजे 100 कोटीचा घोटाळा करणाऱ्या किरीट सोमय्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक झाली पाहिजे अशा तीव्र प्रतिक्रिया त्यांनी दिल्या
यावेळी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड, विठ्ठल ठाकरे, विलास वानखेडे, संजय काईतवाड, प्रकाश रामदिनवार,
,राम नरवाडे,अमोल धुमाळे,लक्ष्मण डांगे, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन प्रविण शिंदे,,अनिल भोरे,अरविंद पाटील,शंकर चलमेलवार,पांडुरंग इंगळे,रमेश गुद्देटवार,सुनील ठाकूर,सह आदी शिवसैनिक उपस्थित होते.
