मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल आ.जवळगावकरांचे हिमायतनगरात स्वागत

हिमायतनगर| हदगाव - हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय तथा विकासाभिमुख नेतृत्व आ.माधवराव पाटील जवळगावकर यांची नुकतीच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. त्याबाबत आज हिमायतनगर येथील कार्यकर्त्यांकडून त्यांचा जंगी स्वागत करण्यात आले.

आज रविवारी आमदार आ.माधवराव पाटील जवळगावकर यांचे आगमन हिमायतनगर येथे झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी निवडीबद्दल हिमायतनगर नगरीचे प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई यांच्या वतीने शाल- श्रीफळ व पुष्पहाराने स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, माजी जी.प.सदस्य सुभाष राठोड, प्रथम नगराध्यक्ष अखिल भाई, शिवाजी पाटील सिरपल्लीकर, खरेदी विक्री संघाचे संचालक परमेश्वर गोपतवाड, माजी नगरसेवक शे.रहीम पटेल, अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष फेरोज खान पठाण, आश्रफ भाई, हमीद सर, राहुल लोणे, दिलीप राठोड, पंडित ढोणे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.