जीवनात प्रत्येक माणसाला काही तरी मिळवायचे असेल काहीतरी बनायचे असेल तर संघर्ष हा करावाच लागतो.संघर्ष हा सगळ्यांना अटळ आहे.आपण जेव्हा संघर्ष करून एखादी गोष्ट मिळवतो त्यातला आनंद हा वेगळाच असतो. असाच संघर्ष पळसपुर गावच्या मारोती वाडेकर यांचा सुरू होता . आणि एकच ध्यास नेहमी होता तो गावचा सरपंच होण्याचा पण या संघर्षमय जिवनात ते सरपंच होण्याचे स्वप्न देखील पुर्ण झाले सरपंच मारोती वाडेकर यांचा दि. 1 एप्रिल रोजी वाढदिवस वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्या अल्पपरिचय.
पळसपुर गावचे रहिवासी मारोती जळबा वाडेकर यांनी अतिशय प्रतिकुल परिस्थितीतून समाज सेवा हाती घेतली. बहूजन चळवळीचे नेते मा. सुरेश दादा गायकवाड, सुभाष दादा दारवंडे यांच्या सहवासात राहून आपल्या समाजासह गोरगरिबांची कामे करण्याची जिद्द त्यांच्या अंगी आहे.
राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असणारे पळसपुर गाव या गावातील अनेकांनी बलाढ्य व्यक्तिने राजकारणात आपले स्थान निर्माण केले .हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर गाव गावातील सर्वच पक्षाच्या मोठ्या पदावर असणारी राजकीय नेते आहेत. एका सामान्य कुटुंबातील असामान्य व्यक्ति मारोती वाडेकर यांनी एक दिवस गावचा सरपंच होण्याचे स्वप्न बाळगून होते. परंतु सरपंच होण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी ठेवावी लागते परंतु एक सर्वसामान्य असणाऱ्या मारोती वाडेकर यांची परिस्थिती बेताची होती. एक पत्रकार म्हणून गावची व्यथा आपल्या लेखणीच्या माध्यमातून वाडेकर यांनी मांडली यातुन वाडेकर यांची गावापासून तालुक्यापर्यंत ओळख निर्माण झाली. त्यामुळे गावातील सर्वसामान्य गोरगरीब नगरीकांची कामे हाती घेऊन ती जबाबदारीने पुर्ण करण्याची हातोटी वाडेकर यांच्या हाती आली.पळसपुर च्या नागरीकांचा विश्वास देखील वाडेकर यांच्यावर जडला तहसील मधील कामे करण्यात वाडेकर अग्रेसर राहिले.यातच ग्रामपंचायत निवडणूक लागली मग मारोती वाडेकर यानी तयारी केली. निवडणुकीत देखील मारोती वाडेकर यांना पराभूत करण्यासाठी अनेक पायंडे वापरले विरोध केला. तरी देखील वाडेकर डगमगले नाहीत .मारोती वाडेकर यांनी आपल्या गावाशी, मातीशी असणारी नाळ कधीही तुटू दिली नाही, गावकऱ्यांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी होत गावच्या संपर्कात राहण्याने आज गावच्या प्रथम नागरीक होण्याचा सन्मान त्यांना प्राप्त झाला. संघर्षातून मारोती वाडेकर पळसपुर गावाचे सरपंच झालेत त्यांच्या कार्यकाळात आणखी जास्तीची कामे होतील हि अपेक्षा आहे.
वाढदिवसा निमित्ताने जीवनात प्रत्येक व्यक्ती एक संकल्प करत असते आणि तो संकल्प पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न ही करत आहे. सरपंच म्हणून भविष्यातील त्यांचे संकल्प सुद्धा खूप आदर्शवत आहेत. वृद्धांना खऱ्या अर्थाने मायेचा आधार देण्यासाठी निराधारांना आधार देऊन त्यांच्या दु:खावर फुंकर घालण्याचे काम करण्याचा मनोदय सरपंच मारोती वाडेकर यांनी व्यक्त केला.
सरपंच मारोती वाडेकर यांना लोकराजा न्यूज व परिवाराच्या वतीने वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
सोपान बोंपीलवार
