शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांच्या पाणपोईचे शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांच्या हस्ते उद्घाटन

हिमायतनगर प्रतिनिधी /-  तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रभर शिव संपर्क अभियान राबविण्यात येत आहे या संपर्क अभियानाच्या निमित्ताने खासदार तथा शिवसेनेचे सचिव अनिलजी देसाई यांनी दिनांक 23 मार्च रोजी हिमायतनगर येथे धावती भेट देऊन येथील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांनी मागील तीन वर्षापासून सुरू केलेल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पाणपोईचे उद्घाटन अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले

    या बाबत सविस्तर वृत्त असे की राज्यात पुन्हा एकदा शिवशाही आणण्यासाठी व शेतकरी कष्टकरी व सर्वसामान्य नागरिकांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याच्या अनुषंगाने आणि शासकीय योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रात सेनेला अधिक बळकट मिळावे म्हणून शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यभर शिव संपर्क अभियान सुरू केले आहे त्या अभियाना साठी शिवसेनेचे नेते तथा सचिव खासदार अनिल देसाई यांनी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथे दि 23 मार्च रोजी सकाळी 11 वाजता धावती भेट देऊन या अभियानास सुरुवात केली आहे त्याला येथील शिवसैनिकानी भरभरून प्रतिसाद देत त्यांचे स्वागत केले व मागील तीन वर्षापासून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी उन्हाळ्यात येथील ज्येष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे यांच्या कडून रहदारी करणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोईची व्यवस्था करण्यात येते त्या पाणपोईचे उद्घाटन शिवसेनेचे सचिव तथा खासदार अनिल देसाई यांच्या हस्ते करण्यात आले 

यावेळी नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख आनंदराव जाधव ,आमदार बालाजी कल्याणकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताभाऊ कोकाटे, माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड ,तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे, उपतालुकाप्रमुख विलास वानखेडे, शहर प्रमुख प्रकाश रामदीनवार , माजी जिल्हा परिषद सदस्य सत्यवर्तन ढोले किसान सेना तालुकाप्रमुख प्रकाश जाधव ,चेअरमन पापा शिंदे,गजानन चायल, बाळु आणा चवरे,राम नरवाडे, नगरसेवक प्र.सावन डाके,संतोष फुलेवार ,शंकर चलमेलवार,कल्याण ठाकूर,शितल सेवनकर,सह आदी शिवसैनिक व युवा सैनिक उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.