दिघी येथे सदगुरू गंगागिर महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त-भव्य रोगनिदान व तपासणी शिबीर संपन्न.......

 हिमायतनगर प्रतिनिधी { गंगाधर गायकवाड }दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी येथे सद्गुरू कर्मयोगी गंगागीर महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य धार्मिक उत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतो. यामध्ये सात दिवस अखंड दत्तनाम सप्ताह व दररोज सकाळी ४ ते ५ भुपाळ्या, सकाळी ६ ते ९ बाळक्रिडा ग्रंथाचे पारायण मुख्य वाचन संत श्री अमृतगिरी महाराज यांचे मार्गदर्शनाखाली होईल. व कथा,भजन,काल्याचे किर्तन होत असते.यामध्ये दोन ते तीन दिवस ग्रामीण यात्रा भरून धार्मिक कार्यक्रम पार पडला जातो.परंतु यावर्षी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड दिघीकर यांनी एक नवीन उपक्रम हाती घेऊन दिनांक २२ मार्च २०२२ रोजी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश पोहरे व प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम वैद्यकीय अधिकारी डॉ.व्हि.डी.नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रोग निदान तपासणी शिबिर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिघी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रांगोळी स्पर्धा, भाषण स्पर्धा, सामान्य ज्ञान स्पर्धा, काव्य कविता स्पर्धाचे आयोजन इयत्ता दुसरी ते पाचवी पर्यंत मुलां मुलींसाठी आयोजित केले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय,तृतीय आलेल्या शालेय मुलां-मुलींना सन्मानपत्र, शाल,श्रीफळ,वही पेन साहित्य पुरस्कार गावातील ज्येष्ठ मंडळीकडून बक्षीस वितरण करण्यात आले.ही स्पर्धा घेण्यासाठी मुख्याध्यापक दिगांबर माने,सहशिक्षक चांदराव सूर्यवंशी,कळसे सर आदींनी परिश्रम घेतले,तर यावेळी सर्व रोग निदान व तपासणी शिबिराचे उद्घाटन संत श्री गंगागिर महाराज दत्त संस्थांचे प्रमुख कर्मयोगी देवगिरी महाराज व इतर मठाचे महाराज यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेची दिपपूजन करून गावातील वृद्ध मंडळींची आरोग्य तपासणी करून गोळ्या, औषधी वाटप करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच गावातील जेष्ठ नागरिक,महिला यांची बीपी,शुगर,रक्त तपासणी करून त्यांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सरसम,उपकेंद्र विरसणीकडे उपचारासाठी बोलवण्यात आले. तसेच यावेळी शिबिराचा लाभ गावांतील व परिसरातील गरजु गावकऱ्यांनी घेतला.या शिबिरामध्ये डॉ.व्ही.डी. नखाते एम.ओ.प्रा.आ.केंद्र सरसम, डॉ.प्रताप परभणकर,एल.बी.नाईक, राजू नागमवाड, सचिन देशमुख डॉ. उज्वला जटाळे,डॉ.भागन वडजे, डॉ.किरण भाले,डॉ.बालाजी मिजगर, विजय खंदारे,अमोल राऊत,सरपंच सौ.छायाबाई बंडू गायकवाड,पोलीस पाटील विलासराव कदम, उपसरपंच सुधाबाई दिगंबर तवर,ग्रा.प.स. संजय घुटे, पंजाबराव कदम, शकुंतलाबाई गायकवाड, सीमा साहेबराव सावते, ग्रामसेवक गजानन शिंदे, शेषराव कदम, विश्वासराव वानखेडे, आशोकराव वानखेडे, कृष्णाजी वानखेडे, सुनील वानखेडे, साहेबराव शिरफुले, आशोकराव शिरफुले, नाना तवर,दत्ता वानखेडे,धोंडोपंत बनसोडे तालुकाअध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन तथा पत्रकार हिमायतनगर,पत्रकार विजय वाठोरे सरसमकर,प्रशांत राहुल वाड यांची विशेष उपस्थिती होती.या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार गंगाधर गणपत गायकवाड दिघीकर आणि यांनी सुरेख नियोजन केले होते.तर देवकाबाई सावते अंगणवाडी कार्यकर्त्या,आशा वर्कर गंगासागर गायकवाड,मदतनीस महाजनबाई,स्वाती गायकवाड यांच्यासह संपूर्ण गांवकऱ्यांनी या कार्यक्रमास परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला आहे.अशा कार्यक्रमाची गावात गरज असल्याचे गावकऱ्यांकडुन बोलल्या जात आहे. दिघी येथील वकील साहेब मा. आमोल माधवराव वाघ व ग्रामपंचायत कार्यालय दिघी, जि.प.प्रा. शाळा दिघी यांनी या कार्यक्रमाला मोलाचे योगदान दिले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.