हिमायतनगर प्रतिनिधी/ सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे मार्फत घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय पात्रता परीक्षेत ( सेट ) बोरगडी येथील राजेश्वर गणपतराव काईतवाड या विद्यार्थ्याने यश संपादन केले आहे त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठा मार्फत विविध विषयासाठी प्राध्यापक होण्यासाठी पात्रता परीक्षा घेण्यात येते . या पात्रता परीक्षेत राज्यभरातून विविध विषयासाठी लाखो फॉर्म येत असतात . जिव विज्ञान या विषयात हिमायतनगर तालुक्यातील तिर्थक्षेत्र बोरगडी येथील रहिवासी असलेल्या राजेश्वर गणपतराव काईतवाड यांनी घवघवीत यश संपादन केले आहे . त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे गुरुवर्य,परिवार यासह बोरगडी ग्रामस्थांनी अभिनंदन व कौतुक करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
