वडगाव शिवारात शेतातील एक हेक्टर हरभर्यावर अज्ञात व्यक्तींनी केली तणनाशक फवारणी


हिमायतनगर प्रतिनिधी/...
तालुक्यातील वडगाव (ज) शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील एक हेक्टर हरभरा असलेल्या शेतात अज्ञात व्यक्तींकडून पुर्ण तणनाशक फवारणी केली असल्याची घटना घडली असून यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पुर्ण हरभरा जळुन गेला असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. 

वडगाव (ज) येथील शेतकरी शामसुंदर लकड़े यांच्या गट क्रमांक 181 मध्ये एक हेक्टर हरभरा पिकाची पेरणी केली होती. पुर्ण हरभरा चांगल्या प्रकारे निघाला होता. या हरभरा पिकाची चांगल्या प्रकारे उगवण होत असताना अचानक या हरभर्यावर अज्ञात व्यक्तींनी तणनाशक फवारणी केली. त्यामुळे शेतकरी यांनी कृषी विभागाच्या तज्ञांना बोलावून शेतकऱ्यांनी  माहिती घेतली असता  कृषी तज्ञांनी पाहणी केली असता हरभरा पुर्णपणे तणनाशक फवारणी मुळे गेला असल्याची माहिती दिली. सदरील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी कृषी विभागाने केली व पंचनामा केला आहे. या हरभरा पिकावर अज्ञात व्यक्तींनी तणनाशक फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.