हिमायतनगर शहरात घरफोडी व पोटा येथील किराणा दुकानात चोरी

चोरट्याना गजाआड करण्याचे आव्हान प्रभारी पोलीस निरीक्षका समोर


हिमायतनगर प्रतिनिधी/ शहर व ग्रामीण भागात पुन्हा चोरटयांनी डोके वर काढले आहे. हिमायतनगर शहरात दि. १४ च्या मध्यरात्रीला तर दि.१५ च्या मध्यरात्रीला पोटा येथील एका किराणा दुकानात अज्ञात चोरट्यानी हात साफ करून हजारोच्या माल व नगदी रक्कम लंपास केली आहे. या चोरट्याना गजाआड करण्याचे आव्हान नव्याने हिमायतनगर ठाण्याचा प्रभारी पोलीस निरीक्षकाच्या पदभार घेतलेल्या पोलीस निरीक्षकांसमोर उभे आहे.


दि.१४ च्या मध्यरात्रीला तालुक्यातील मौजे पोटा येथील फिर्यादी सौ. सागर माधव ईबितवार, यांचे घरात शिरून अज्ञात चोंरट्यानी दुकानातील किराणा सामान किंमती 23,000/-रु व कापड 32,000/-रुपयाचे माळ चोरून नेला. एवढेच नाहीतर चोरट्यानी साक्षीदार यांचे घरातील सोन्या चांदीचे दागीने किंमती 4500/-रुपयाचा असा एकुण 59,500/-रुपयाचा माल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद सौ. सागर माधव ईबितवार, वय 42 वर्षे, व्यवसाय व्यापार रा. पोटा बु. ता. हिमायतनगर जि. नांदेड यांनी हिमायतनगर पोलीस ठाण्यात दिल्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोहको कदम हे करीत आहेत.


तर दुसरी घटना हिमायतनगर शहरात दि.12 ते दि.14 च्या मध्यरात्रीच्या घडली असून, फिर्यादीचे घराचे गेटचे कोणीतरी अज्ञात आरोपीतांनी कुलूप तोडुन आत प्रवेश केला. आणि कपाटाची मोडतोड करून त्यात ठेवलेले नगदी 55,000/-रु चोरुन नेले. अशी फिर्याद रविंद्र पि. दिगांबर शिंदे, वय 36 वर्षे, रा. हिमायतनगर यांनी दिल्यावरून ज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान चोरीचा तपास लावण्यासाठी पोलीस निरीक्षक अशोक अंतत्रे यांनी पथक नेमले असून, श्वान पथक व ठसे तज्ज्ञांच्या माध्यमातून पोहको अशोक सिंगनवाड हे करीत आहेत.


प्रभारी पोलीस निरीक्षकाच्या पदभार पोलीस निरीक्षक अशोक अंतत्रे यांनी घेतल्यानंतर चोरट्यानी दोन ठिकाणी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही चोरीच्या घटनांचा तपास लावून नागरिकांना दिलासा देणे आणि चोरट्याना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान हिमायतनगर पोलिसांसमोर उभे आहे. 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.