हिमायतनगर प्रतिनिधी/शहरातील सिमेंट रस्ते नाल्या सह विविध कामासाठी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी तिन कोटीं रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्या 3 कोटींच्या विकास कामांचे रविवारी जवळगावकर यांच्या हस्ते भुमिपुजन होणार आहे.
हिमायतनगर शहरात अंतर्गत असलेल्या अनेक रस्त्याच्या कडेने नाली बांधकाम नसल्यामुळे पाणी रस्यावर वाहत होते.
तर काही भागात कच्च्ये रस्ते नागरीकांना पावसाळ्यात चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. याकरीता शहरातील विविध रस्त्याच्या कामासह नाली बांधकाम व सभागृहासाठी तब्बल तिन कोटींचा निधी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मंजूर करून आणला आहे.
सदरील निधी मधुन शहरातील वार्ड क्रमांक 10 मधील पाटील हास्पिटल ते नडव्याच्या पुलापर्यंत नाली बांधकाम करणे 1 कोटी 25 लाख , वार्ड क्रमांक 11 मध्ये सि. सि.रस्ता व नाली बांधकाम करणे 15 लाख, वार्ड क्रमांक 11 मध्ये सि. सि. रस्ता व नाली बांधकाम करणे 20 लाख, वार्ड क्रमांक 13 मध्ये नाली बांधकाम करणे 20 लाख रुपये, वार्ड क्रमांक 6 मध्ये सि. सि. बांधकाम करणे 15 लाख रुपये, वार्ड क्रमांक 15 मध्ये सि. सि. रस्ता व पुलाचे बांधकाम करणे , वार्ड क्रमांक 3 मध्ये सि. सि. नाली बांधकाम करणे 20 लाख रुपये, वार्ड क्रमांक 15 मधील मस्जिद पासून सि. सि. रस्त्याचे बांधकाम करणे 10 लाख रुपये, वार्ड क्रमांक 15 मध्ये मस्जिद पासून पारडी रोड पर्यंत सि. सि. नाली बांधकाम करणे 10 लाख रुपये, सि. सि. रस्ता बांधकाम व नाली बांधकाम 10 लाख रुपये, वार्ड क्रमांक 12 मध्ये सि. सि. रस्ता व नाली बांधकाम करणे 10 लाख रुपये, शहरातील शादी खाण्या बाजुला शेड उभारणी करणे असे एकूण शहरातील विविध कामासाठी तिन कोटी रुपयांचा निधी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी मंजूर केला आहे. या सर्व कामांचे भुमिपुजन आ. माधवराव पाटील जवळगावकर यांच्या हस्ते होणार आहे.जिल्हा मध्यवर्ती बँक , पाटील हास्पिटल जवळ रविवारी दुपारी 01 वाजता
भुमिपुजन सोहळ्यास कार्यकर्ते नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
