बिरसा मुंडा जयंती निमित्त पिचोंडीत कबड्डी स्पर्धा
हिमायतनगर प्रतिनिधी/ ग्रामीण भागातील खेळाडूंनी जिल्हास्तरासह देशपातळीवर नावलौकिक व्हावे यासाठी कबड्डी स्पर्धेसह क्रिडा क्षेत्राकडे लक्ष केले पाहिजे असे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी पिचोंडी येथे आयोजित कबड्डी स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी केले आहे.
पिचोंडी येथील आदिवासी बांधवाच्या वतीने दरवर्षी भगवान बिरसा मुंडा जयंती चे आयोजन करण्यात येते या निमित्ताने कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.आ.जवळगावकर यांच्या हस्ते पिचोंडी गावातील पाच लाख रुपयांच्या विकास कामाचे उदघाटन करण्यात आले. व भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. यावेळी आ. माधवराव पाटील जवळगावकर बोलताना म्हणाले की पिचोंडी गावातील आदिवासी बांधवांच्या भविष्यातील अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असून पिचोंडी गावातील नागरिकांना घर तेथे नळ देऊन कायमचा पाणी प्रश्न सोडविण्या करीता गावचे नाव जल जिवन योजनेत समाविष्ट केले असून लवकरच पाणी पुरवठ्याचे काम सुरू होणार असून कायमचा पाणी प्रश्न सुटणार असल्याचे सांगितले आहे. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी नगराध्यक्ष अ. आखील अ. हमीद, माजी संचालक गणेश शिंदे, तंटामुक्तीचे अध्यक्ष डॉ गफार, प्रा. डि. डि. घोडगे, सरपंच गजानन कदम, पोलीस पाटील कैलास डुडुळे,सोपान बोंपिलवार,उपसरपंच रोशन धनवे, रामेश्वर यमजलवाड, दता चिंतलवाड, गजानन मिराशे, बाबराव डवरे, रामा मिराशे,कबड्डी स्पर्धेच्या कमिटी चे अध्यक्ष बालाजी धनवे, उपाध्यक्ष दता डुडुळे, सचिव पंडित बनसोडे, अगंद सुरोशे, संदीप मिराशे, यांच्यासह पिचोंडी कारला येथील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
