समाजकारणातील, राजकारणातील उमदा तरुण म्हणजेच भागवत देवसरकर- सत्यपाल महाराज

 येणार्‍या काळात भागवत देवसरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार- प्रणितीताई चिखलीकर


हिमायतनगर प्रतिनिधी/सध्या राजकारण, समाजकारणाची वाटचाल वेगळ्या दिशेने चालू आहेत, अशातच राजकारणात समाजकारणात तरुणांनी सक्रियपणे सहभागी होऊन समाज परिवर्तनासाठी झोकून द्यावे, समाजाचे परिवर्तन करावे याच धर्तीवर आपले योगदान देऊन समाज परिवर्तन करण्यासाठी भागवत देवसरकर यांची धडपड चालू असल्याचे प्रतिपादन उमरी ता. हदगाव येथे भागवत देवसरकर मित्रमंडळ आयोजित सत्यपालची सत्यवाणी कीर्तनाच्या कार्यक्रमात बोलताना महाराष्ट्रातील समाज प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी उद्घाटन नांदेड जिल्हा परिषदेच्या सदस्या प्रणितीताई देवरे चिखलीकर यांनी केले, पुढे बोलताना सत्यपाल महाराज यांनी सद्य परिस्थितीवर भाष्य करत समाजातील तरुणांनी व्यसन न करता आपले आयुष्य जगले पाहिजे, राष्ट्रसंत गाडगेबाबा तुकडोजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आजच्या युवकांनी स्वावलंबी व मजबूत, निरोगी जीवन जगले पाहिजे, असेही यावेळी त्यांनी सांगितले. उदघाटकीय भाषणामध्ये बोलताना जिल्हा परिषद सदस्या प्रणितीताई चिखलीकर यांनी भागवत देवसरकर मित्रमंडळाच्या या कार्यक्रमाचे कौतुक करून समाज प्रबोधन कार्यक्रम राबवले पाहिजेत, येणार्‍या काळात भागवत देवसरकर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे यावेळी बोलताना सांगितले. प्रास्ताविकामध्ये भागवत देवसरकर यांनी या पुढील काळात जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये सर्व महापुरुषांच्या जयंत्या साजर्‍या करून महामानवांचे विचार सर्व जनतेपर्यंत पोचण्याचे काम भागवत देवसरकर मित्र मंडळाच्या माध्यमातून करण्यात येईल, असे सांगितले. यावेळी कोरोना काळात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या सर्व मान्यवरांचा सन्मानपत्र, मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, पोलीस पाटील, चेअरमन, तंटामुक्तीचे अध्यक्ष व सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, नागरिक, महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षय पतंगे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सतीश शिंदे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उमरी ग्रामस्थ भगवती देवी शेतकरी उत्पादक कंपनी, राष्ट्रमाता जिजाऊ माती परीक्षण केंद्राच्या सर्व कर्मचार्‍यांनी विशेष परिश्रम घेतले.

-

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.