हिमायतनगरातील ३ विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

 गुणवंत विद्यार्थ्यांनाच मेडल, प्रमाणपत्र देऊन झाला गौरव
 



हिमायतनगर| येथील आर.एम. कोचिंग इंस्टीट्युटच्या १३ विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील खेळ प्रकारातील  चित्रकलेच्या ड्रॉईंग एन्ड पेंटिंग या क्षेत्रात मागील २ महिन्यापूर्वी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत सहभाग घेतला होता. या परिक्षेत येथील सर्वच विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले आहे. त्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याने या सर्व विद्यार्थ्यांना मेडल, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

हिमायतनगर शहरातील आर.एम. कोचिंग इंस्टीट्युट अल्पवधीतच नावारूपाला आले आहे. या संस्थेचे संचालक राम बोलपेलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक रुपाली गुंडेवार मैडम, लक्ष्मण मिरेवाड सर, रीतिषा धुमाळे मैडम यांच्या पुढाकारातून १३ विद्यार्थ्यांची जागततिक स्तरावरील खेळ प्रकारातील ड्रॉईंग एन्ड पेंटिंग या चित्रकलेच्या परीक्षेची तयारी करून घेण्यात आली होती. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या हस्ते ड्रॉईंग आणि पेंटिंग करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड पाठविण्यात आले. त्यानंतर २ महिन्याने या परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

आरएम इन्स्टिट्यूटच्या या यशस्वी विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन दि.२३ रोजी येथील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात पीपल्स कॉलेजचे इंग्रजी विषयाचे असोसिएट प्रोफेसर प्रा.डी.एन.मोरे यांच्या हस्ते भारत माता, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून झाली. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हुजपाच्या प्राचार्य उज्वला सदावर्ते मैडम या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पीपल्स कॉलेजचे उपप्राचार्य डॉ.बी.डी.कोम्पलवार, हिमायतनगरचे गटविकास अधिकारी अदिलवाड सर, हिमायतनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी, हुजपाचे सिनियर लेक्चरर प्रा.डॉ.एल.बी. डोंगरे, प्रा.डी.के.कदम, हुजपा क्रीडा विभाग प्रमुख माने सर, प्रा.डॉ.वसंत कदम, नांदेड न्यूज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार, वज्रसूची न्यूजचे संपादक शुद्धोधन हनवते यांची मंचावर उपस्थिती होती.

उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते जागतिक परीक्षेत यश मिळविलेल्या कु.नीतिशा चंडालिया, कु.नेहा काळे, कु.शेख. फाकीया शेख. जलील, कु.प्रियंका धुमाळे, कु.संपदा मनमंदे, कु.मैथिली चंडालिया, वेद गोणेवार, अमित हनवते, सुमित हनवते, आयुष मारावार, शेख. इजहार शेख. जलील, कु. श्री राजपुरोहित, चंद्रवीर राजपुरोहित या विद्यार्थी - विद्यार्थिनींचा मेडल, प्रमाणपत्र पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भगवान काळे, शेख जलील, संतोष गोणेवार, विजयसिंह राजपुरोहित,  छायाचित्रकार माधव यमजलवाड आदींसह विद्यार्थी व महिला- पुरुष पालक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.  



 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.