माजी आ.नागेश पाटील आष्टीकर यांची भेट
हिमायतनगर प्रतिनिधी/(दत्ता पुपलवाड)तालुक्यातील वडगाव (ज)येथील बसस्थानकाजवळ श्री साई बाबांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करून भव्य दिव्य असे मंदिर देखील उभायारण्यात आले. असुन सोमवारी साई बाबांच्या मुर्तीची मोठ्या भक्ती भावाने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुक्यातील नांदेड किनवट राज्य महामार्गावर असलेल्या वडगाव (ज) येथे काही वर्षांपासून साई बाबांची मुर्ती आहे. आजही ते मंदिर आणि मुर्ती असुन याच ठिकाणी या वर्षी नव्याने भव्य असे मंदिर उभारून साई बाबांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या निमित्ताने तिन दिवसापासून होम यज्ञ सुरू असुन वडगाव गावातुन साई बाबांच्या मुर्तीची टाळ मृदगांच्या गजरात वाजत गाजत भक्तीमय वातावरणात भव्य नगरप्रदिक्षा काढुन सोमवारी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
या कार्यक्रमास माजी आ. नागेश पाटील आष्टीकर यानी भेट दिली यावेळी,राम राठोड, संजय काईतवाड, विठ्ठल ठाकरे,सरपंच विशाल राठोड,शाम ढगे, सदाशिव बाचकलवाड महाराज, राजेश जाधव, माणिकराव सुर्यवंशी, डॉ.मनोहर राठोड,पोलीस पाटील ताडकुले, दत्ता पाटील, अंकुश लकडे, दाजीबा वाकोडे, बालाजी करेवाड, अशोक वाकोडे,परमेश्वर ताडकुले, सतीश खुने,लखन जैस्वाल, डॉ.ढगे ,करेवाड,खुणे, देवानंद सुर्यवंशी, तुकाराम शिंदे,महेश ताडकुले,प्रकाश बिरकुरे, यांच्यासह पंचक्रोशीतील भाविकांची गर्दी मोठ्या संख्येने होती यात्रेचे स्वरूप होते.
