वाडी फाटा ते कांडली बु जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजुरी
हिमायतनगर प्रतीनिधी (गंगाधर वाघमारे) महामार्ग भोकर ते किनवट वरील वाडी फाटा ते कांडली बु जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजुरी मिळाली असून या रस्त्याच्या अभियंत्याच्या निष्काळजी पणा चा फायदा घेत गुतेदाराने चक्क वळण रस्तान बनवता च पुलाच्या खोदकाम केल्याने कांडली तांडा ते कांडली गावाचा संपर्क तुटला असून या अडचणीच्या मार्गातून रस्ता शोधून कांडली गावाकडे जाणाऱ्या व येणाऱ्याना पाय घसरून निमंत्रण दिल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे .
याबाबत सविस्तर वृत्त असे की 'हिमायतनगर तालुक्यातील कांडली गावाचा तालुक्याला जोडणाऱ्या रस्त्याचे अंतर कमी करून तालुक्यावर लवकर जनतेला जाता यावे या हेतूनेमुख्यमंत्री सडक योजनेतून जवळपास चार कोटी रुपयाच्या कामालामागील काही काळापूर्वी मंजुरी मिळाली असून या रस्त्यावरील प्रथमतः पुलाच्या कामाला प्राधान्य देऊन ठेकेदाराने पुलाचे काम चालू केले आहे .या रस्त्यावरील लहान लहान मुलांचे काम पूर्ण झाले असून यापैकी एक पूल बारमाही वाहणाऱ्या नाल्यावर असून आज घडीलाही या नाल्यावर मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह चालू आहे .अशा परिस्थितीत येथील पुलाचे खोदकाम चालू केले असून या ठिकाणी वळण रस्ता तयार न केल्यामुळे जाणारा येणारा ला वाहनाने तर सोडाच साधे पायी - पायी सुद्धा चालणे कठीण झाले आहे .सदर पुलाचे खोदकाम करण्यापूर्वी गुत्तेदारनी वळण रस्ता बनविणे कर्म प्राप्त होते .परंतु गुत्तेदार आणि तसे न केल्याने गावकऱ्यांना कांडली तांडा ते कांडली बुया गावाला जाणे-येणे करण्यासाठी वडगाव खुर्द पारवा फाटा ' रेल्वे स्टेशनते कांडली असा प्रवास करून दहा किलोमीटरचा फेरा पडत आहे .ही बाब सदरील रोडच्या अभियंत्याला व संबंधित गुत्तेदार आला का दिसत नसावी हा एक संशोधनाचा भाग आहे .सदर कामाच्या बाबतीत वळण रस्ता व त्याच्यासाठी अंदाजपत्रकात तशी तरतूद आहे की नाही असे आमच्या प्रतिनिधीने संबंधित अभियंत्याला भ्रमणध्वनीवरूनविचारपूस केली उडवाउडवीची उत्तरे दिली आहेत
कांडली तांडा येथे तारीख 24 डिसेंबर रोजी एका लग्नाचे नियोजन होते या तांड्याला जाण्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या पाहुण्यांची वृद्ध माणसांची 'लहान लहान लेकरांची या रस्त्यावरून पाळी जाताना मोठी कसरत झाली असून त्यामुळे अनेकांनी आपल्या भावना आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले आहे .सदर पुला च्या ठिकाणी वळण रस्ता करूनच कामाला सुरुवात करावी अशी या भागातील जनतेची मागणी आहे .
