हिमायतनगर शहरातील एका घरातून दिवसा झाली चोरी; पोलिसात तक्रार
0
December 29, 2021
हिमायतनगर प्रतिनिधी/ शहरातील परमेश्वर मंगल कार्यालयाच्या पाठीमागील गल्लीत एका मजुरदार शेतकऱ्याच्या घरात दिवसा कडीकोंडा तोडून अज्ञात चोरट्याने सामानाची नासधूस करून चोरी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याने हिमायतनगर पोलिसात तक्रार दिली आहे. घटनास्थळी पोलिसांनी उपेक्षित होऊन तपास सुरु केला आहे.
हिमायतनगर शहर परिसरात मागील काळात अनेक चोऱ्या झाल्या, त्या चोऱ्यांचा तपास जैसेथेच असून, पोलिसांनी रात्रगस्त वाढविल्याने चोऱ्यांचे प्रमाण कमी झाले. मात्र दि.२८ रोजी भरदुपारी शहरातील परमेश्वर मंगल कार्यालयाच्या पाठीमागील रुख्मिणीनगरला लागून असलेल्या मारोतराव डाके या मजुरदार शेतकऱयांच्या घरात कोणी नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच अलमारीत ठेवलेले ४ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि पेटीत ठेवलेली ०९ हजाराची रक्कम लंपास केली अशी माहिती तक्रारदार शेतकरी मारोती डाके यांनी दिली.
शेतकरी दुपारी ३ वाजता जेंव्हा घरी आला तेंव्हा घराचे काडी कोंडा व एक कुलूप तोडून चोरट्याने चोरी केल्याचे लक्षात आले. याबाबाची माहिती पोलिसांना देताच पोलीस निरीक्षक भगवान कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी महाजन, जमादार सिंगणवाड यांनी भेट देऊन पाहणी केली आणि चोरट्याने केलेल्या कारनाम्याचा तपास सुरु केला. चोरीच्या या घटनेमुळे ग्रिम मजुरदार कुटुंब हतबल झाले असून, यांची पाणीने तर जमा पुंजी चोराने नेल्याने हंबरडा फोडला होता.
Tags
