शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यानंतर भवितव्य देखील घडणार... आ. जवळगावकर

 हिमायतनगर... लहान बालकांना सायप्रस कडुन पाया मजबूत करण्यासाठी सस्थेसह शिक्षकवृदाचे कार्य कौतुकास्पद आहे.आठ वर्षांपासून सुरू झालेल्या या संस्थेने अन्य संस्थेच्या तुलनेत ना नफा ना तोटा या बेसवर सामाजिक बांधिलकी अंगीकारुन करीत असलेले काम वाखाणण्याजोगे आहे.प्राथमिक शिक्षणाचा पाया मजबूत झाल्यानंतर इमारत चांगली होऊ शकते असेच काम येथे चालु असल्याचे आ.माधवराव पाटील जवळगावकर यांनी प्रतिपादन केले. हिमायतनगर तालुक्यातील खडकी फाट्यावरील सायप्रस इंग्लिश स्कूल च्या वतीने ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी स्नेहसंमेलनात अध्यक्षीय समारोप करताना आ.जवळगावकर पुढे म्हणाले की,शिक्षण क्षेत्रात प्राथमिक शिक्षणाला खूप महत्त्व आहे. स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून चिमुकल्या बालकांना कला सादर करण्याची संधी मिळाली आहे.याप्रसगी जवळगावचे माजी सरपंच उत्तमराव पाटील पवार, भारतीय स्टेट बँकेचे शाखाधिकारी अमय बर्वे, पंचायत समितीचे कक्ष अधिकारी पांडुरंग गायकवाड, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषदादा राठोड,सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, मुख्याध्यापक गजानन सुर्यवंशी, सभापती डॉ प्रकाश वानखेडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय माने, बँकेचे अभय कोलगे, सरपंच सौ.वदना पोपलवार,सौ.वनिता पुठेवाड,सौ.प्रितीताई सुर्यवंशी,सौ.काशाबाई ठाकुर,सोनारी चे पोलिस पाटील पवार,राम गुंडेकर, योगेश चिलकावार, पांडुरंग गाडगे, सतीश नारखेडे यांच्या सह पालकांची ऊपस्थीती होती.प्रस्ताविक संस्थेचे दिलीप राठोड यांनी केले.सर्व प्रमुख अतिथीचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.शाखाधिकारी अमय बर्वे, गायकवाड यांनी समायोचीत मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक विनोद राठोड, शिक्षक श्नध्दा दमकोडवार, अंजली येरेकार,स्वप्ना ताटिकुडलवार,स्वप्ना चव्हाण,आर्मी, दिक्षा बनसोडे, जोशी, अतुल बिच्चेवार, सुनील जोशी आदिनी परीश्नम घेतले.सचलन रेखा चव्हाण यांनी केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.